॥ क्षात्र तेज ऐक्य ॥

या वेबसाईटवर क्षात्रैक्य परिवारातील सर्वांचे सहर्ष स्वागत आहे....

समाजाबद्दल माहिती - संकल्पना अलिबाग तालुक्यातील ७२ गावांमध्ये असलेला माळी समाज एकसंघ असावा. माळी समाजातील विविध पोटजातींच्या असलेल्या संस्थांचा एका छत्रीखाली वावर असावा आणि वेळप्रसंगी त्या संस्थांना मार्गदर्शनाची गरज पडल्यास एक प्रेरणास्थान असावे अशी संकल्पना ठेवून संस्थेचा उगम झाला.

बृहन्महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णातील चौकळशी व पाचकळशी नावाने ओळ्खल्या जाणाऱ्या म्हणजेच १) चौकळशी – सोमवंशी पाठारे क्षत्रिय २) चौकळशी – सोमवंशी क्षत्रिय ३) पाचकळशी – सोमवंशी क्षत्रिय ४) पाचकळशी – पाठारे क्षत्रिय ५) पाचकळशी – पाठारे क्षत्रिय, सोमवंशी क्षत्रिय पाठारे या एकत्रित ज्ञातीतील गुजरात मधील बलसाड जिल्ह्यातील देहरी गाव, पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, वसई तालुके, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, ठाणे तालुके, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड तालुके, रत्नागिरी जिल्ह्ययातील दापोली ताल्युक्यातील केळशी व वेळास व बृहन्मुंबई यातील सुमारे ११० गावातून पसरलेला समाज.

या मधील विशेषत: अलिबाग, मुरुड तालुक्यातील या सर्व क्षत्रिय वर्णातील पाच ज्ञातीच्या गटांचे एकीकरण दृढ करण्यासाठी क्षात्रेक्य समाज अलिबाग या संस्थेची स्थापना अलिबाग येथे सन २००१ साली झाली. या नंतर समाजाचे स्वत:चे आदर्श अशा प्रकारचे मंगल कार्यालय असावे अशा उद्देशाने संस्थेने स्वत:ची जागा कुरूळ, तालुका अलिबाग येथे खरेदी केली. त्यानंतर या जागेमध्ये अतिशय देखणे असे मंगल कार्यालय सन २००२ साली चालू करण्यात आले. सदर मंगल कार्यालय अलिबाग विभागातील सर्व समाजातील लोकांना वापरासाठी अल्पशा मोबदल्यामध्ये दिले जाते, तसेच संस्थेचे स्वत:चे अधिकृत कार्यालय देखील याच इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आहे.

क्षात्रैक्य समाज अलिबाग आज दिनांक ०७-०१-२०१८ रोजी आपल्या १७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हि वेबसाईट चालू करीत आहोत. सदर वेबसाईटमध्ये प्रामुख्याने वधू-वर मेळाव्याच्या धरतीवर इतर व्यवसाईक वेबसाईट सारख्याच सुविधा देण्यात येणार आहेत.

संस्थापकीय अध्यक्ष: कै. श्री . ग . चि. पाटील

समाजकार्य


सभासदत्व


क्षात्रैक्य समाजाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सभासदव्हा व समाज करीत असलेल्या कार्यात सहभागघ्या.